Adv. Rohini Khadse  कष्टकरी, शेतकरी माता भगिनी युवकांच्या सन्मानासाठी जनसंवाद यात्रा : अ‍ॅड.रोहिणी खडसे

0

Jan Samswad Yatra for the honor of hardworking, farmers mothers and sisters youth : Adv. Rohini Khadse
मुक्ताईनगर :
मतदारसंघातील 182 गावात जाऊन तेथील जनतेसोबत संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ध्येय-धोरणे जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी आमदार एकनाथराव खडसे आणि जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अ‍ॅड.रोहिणी खडसे यांनी राष्ट्रवादी जनसंवाद यात्रा काढली आहे. यात्रेच्या पंधराव्या दिवशी रोहिणी खडसे यांनी रावेर तालुक्यातील मांगी, चुनवाडे, थोरगव्हाण, बोरखेडा, कोचुर बु.॥ येथील ग्रामस्थांसमवेत संवाद साधला.

यांची होती उपस्थिती
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, विनोद तराळ, ईश्वर रहाणे, निवृत्ती पाटील, सोपान पाटील, विलास धायडे, यु.डी पाटील, प्रदीप साळुंखे, बाळा भालशंकर, विनोद काटे यांची प्रमुख उपस्थिती होती.

शेवटच्या घटकांपर्यंत भेट घेणार : अ‍ॅड.रोहिणी खडसे
कोचुर येथे कॉर्नर सभेत मनोगत व्यक्त करताना रोहिणी खडसे म्हणाल्या की, कष्टकरी, शेतकरी माता भगिनी युवकांच्या सन्मानासाठी राष्ट्रवादी आपल्या भेटी हे ब्रिद वाक्य घेऊन मतदारसंघातील अंतिम घटकापर्यंत जाऊन त्यांच्या समस्या अडी-अडचणी जाणून घेण्यासाठी व त्यांच्या सोबत संवाद साधण्यासाठी जनसंवाद यात्रा सुरू केलेली आहे.

 


error: Content is protected !!