भुसावळातील स्मशानभूमीचा लवकरच होणार कायापालट

साईजीवन शॉपीला स्मशानभूमी तीन वर्षांसाठी दत्तक : निर्मल कोठारींचा सोयी-सुविधा पुरवण्याचा मानस


The graveyard in Bhusawal Will Soon Undergo Transformation भुसावळ : शहरातील तापी काठावरील हिंदू स्मशानभूमीचा लवकरच कायापालट होणार आहे. भुसावळातील माजी नगरसेवक संचालक पिंटू (निर्मल) कोठारी यांच्या साईजीवन सुपर शॉपीला पुढील तीन वर्षांसाठी स्मशानभूमी देखभाल-दुरुस्तीसाठी पालिकेने ठराव करून दिली आहे. कोठारी यांच्यातर्फे आता स्मशानभूमीत पाण्याची व्यवस्था, दैनंदिन साफसफाई, पथदिवे दुरुस्ती, सीसीटिव्ही कॅमेरे, वृक्षारोपण आदींची सुविधा मिळणार असून लवकरच मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी लाकडे पुरवण्याचा मनोदयही कोठारी यांनी व्यक्त केला आहे शिवाय गेल्या दहा वर्षांपासून बंद असलेली मृत्यूची नोंदणीही या ठिकाणीच होणार असल्याने आप्तांचा मोठा त्रास थांबणार आहे.

वास्तू दत्तक देण्याची केली मागणी
साईजीवन सुपर शॉपीचे संचालक तथा माजी नगरसेवक निर्मल कोठारी यांनी पालिकेकडे 30 ऑगस्ट रोजी स्मशानभुमीचा सांभाळ करण्यासाठी ही वास्तू दत्तक देण्याची मागणी केली होती. या अर्जावर पालिकेने 1 सप्टेंबर रोजी प्रशासकिय ठराव क्रमांक 162 नुसार ठराव मंजूर केला. स्मशानभूमीचा सांभाळ करण्यासाठी प्रशासनाने साईजीवन सुपर शॉपीला तीन वर्षांचा कालावधी दिला. या कालावधीत स्मशानभुमीत पाण्याची व्यवस्था, दैनंदिन साफसफाई, पथदिवे दुरुस्ती, सीसीटिव्ही कॅमेरे, वृक्षारोपण आदी सुविधा द्याव्या लागतील यासोबतच शववाहिकेची व्यवस्था करण्याचे नियमांमध्ये उल्लेख आहे. माजी नगसेवक निर्मल कोठारींच्या माध्यमातून शहरात गेल्या अनेक वर्षांपासून ही सुविधा दिली जात आहे.

आगामी काळात मोफत लाकडे देणार : पिंटू कोठारी
अंत्यसंस्कारांसाठी स्मशानभुमीत आगामी काळात मोफत लाकडे (सरण) देण्याबाबतही विचार केला असून लवकरच ही सेवाही साईजीवन शॉपीच्या माध्यमातून सुरू करण्यात येईल. गत दहा वर्षांपूर्वी मृत्यूची नोंद यावल नाक्यावर केली जात होती मात्र काही कारणास्तव ती बंद झाली मात्र आता नव्याने ही सेवा सुरू करण्यात येईल जेणेकरून नातेवाईकांचा होणारा त्रास वाचेल, असे माजी नगरसेवक
व साईजीवन सुपरशॉपी संचालक पिंटू (निर्मल) कोठारी म्हणाले.


कॉपी करू नका.