विवरा गावातील विवाहितेचा मृत्यू : निष्काळजीपणा करणार्‍या डॉक्टरांविरोधात निंभोरा पोलिसात गुन्हा


Death of wife due to negligence: Crime against doctor in Vivara village रावेर : विवरा, ता.रावेर येथील विवाहितेचा डॉक्टरच्या निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याने विवरा येथील समर्थ क्लीनीकचे डॉ.प्रशांत अहिरे यांच्याविरोधात निंभोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल्याने वैद्यकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

निष्काळजीपणाने मृत्यूचा आरोप
विवर्‍यातील डॉ.प्रशांत अहिरे यांनी 13 मार्चच्या सकाळी 10 वाजेपासून ते 31 मार्चच्या 2021 च्या रात्री 1.30 वाजेच्यादरम्यान विवरा गावातील गायत्री सचिन पाटील (विवरा) यांच्यावर उपचार केले होते मात्र निष्काळजीपणाने, हयगयीने केलेल्या उपचारामुळे व औषधे लिहून देण्यास सक्षम नसताना ओव्हर डोस लिहून दिल्याने विवाहिता गायत्री यांचा 1 जून 2021 रोजी मृत्यू ओढवला होता.

निंभोरा पोलिसांनी चौकशीअंती केला दाखल गुन्हा
या प्रकरणी मयत विवाहितेचे पती सचिन पाटील यांनी निंभोरा पोलिसांकडे पाठपुरावा करीत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. निंभोरा पोलिसांनी या प्रकरणी चौकशी केल्यानंतर उपनिरीक्षक काशीनाथ कोळबे यांनी निंभोरा पोलिसांत फिर्याद दिल्याने संशयीत आरोपी डॉ.प्रशांत अहिरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहा.निरीक्षक गणेश धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.


कॉपी करू नका.