चाळीसगाव तालुक्यातील जलयुक्त शिवार योजनोंच्या गटविकास अधिकार्‍यांकडून पाहणी


Inspection by Group Development Officers of Jalyukta Shivar Schemes in Chalisgaon Taluk चाळीसगाव : चाळीसगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर यांनी रविवार, 2 ऑक्टोबर रोजी खेडगाव पंचक्रोशीतील गावांना भेटी दिल्या. पंचक्रोशीत चाळीसगाव विकास मंचच्या वतीने झालेल्या जळ्युक्त शिवार कामांची वाळेकर यांनी पाहणी केली. नाला खोलीकरण, बंधारे आणि शेततळी याबाबत विकास मंचचे अध्यक्ष प्रफुल्ल साळुंखे यांनी माहिती दिली. यावेळी खेडगाव ग्रामपंचायत तसेच प्राथमिक शाळेच्या शिक्षण समितीच्या वतीने वाळेकर यांचा सत्कार करण्यात आला.

यांची होती उपस्थिती
खेडगाव गावातील मराठी शाळेला दीडशे वर्ष पूर्ण झाल्याने मोडकळीस आलेल्या ईमारतीच्या जागी नवीन इमारत उभारणी करावी तसेच गावाच्या दर्शनी भागात उद्यान तयार करण्याबाबत निवेदन वाळेकर यांना देण्यात आले. यावेळी रमाकांत साळुंखे, महेंद्र साळुंखे, प्रमोद साळुंखे, कैलास साळुंखे, बापू नाईक, सरपंच दत्तात्रय माळी, निलेश साळुंखे , रवींद्र साळुंखे, क्रांती साळुंखे, मुख्याधापक चौधरी, हाडपे, संजय साळुंखे, पिंजारी आदी उपस्थित होते.