ट्रकमधील 50 लाखांच्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू लांबवल्या : अचलपूरच्या संशयीताला अटक


Electronic goods worth 50 lakhs stolen from truck: Suspect arrested from Achalpur धुळे : ब्लु डार्ट कुरीयर कंपनीचा माल घेवून डिलेव्हरीसाठी निघालेल्या कंटेनरमधील 50 लाखांच्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू मुकटीजवळील अजंग शिवारातून लांबवण्यात आल्या होत्या. धुळे तालुका पोलिसात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर कंटेनरच्या पाठलाग करणार्‍या वाहनावर संशय आल्यानंतर अचलपूरच्या एका संशयीताला 6 रोजी रात्री अटक करण्यात यंत्रणेला यश आले आहे. अमोल रामराव सरदार (35 रा.हनुमानखेडे, ता.अचलपुर, जि.अमरावती) असे अटकेतील आरोपीचे नाव असून त्यास न्यायालयात हजर केल्यानंतर चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

50 लाखांच्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू लांबवल्या
ब्लु डार्ट कुरीयर कंपनीचा माल घेतलेला कनिफनाथ रोडलाईन्सचा ट्रक (क्र.एम.एच.14 जे.एल. 8299) हा 30 नोव्हेंबर रोजी लॅपटॉप, एलईडी टीव्ही अशा इलेक्ट्रॉनिकच्या वस्तु घेवून निघाल्यानंतर गुरुवार. 1 डिसेंबर रोजी पहाटे दीड वाजेच्या सुमारास हा ट्रक धुळे तालुक्यातील अजंग शिवाराकडे येत अजंग शिवारातील पाईप फॅक्टरीजवळ चालकाला झोप आल्यानंतर कंटेनर रस्त्याच्या बाजूला उभा करून चालक झोपल्याची संधी चोरट्यांनी साधली. त्यांनी या ट्रकला लावलेले इलेक्ट्रॉनिक लॉक तोडून ट्रकमधील 49 लाख 1 हजार 908 रूपये किंमतीचे 57 नग, एससीडी, लॅपटॉप व इतर माल लंपास केला. कंटेनर चालकाला जाग आल्यावर चोरट्यांनी ट्रक निम्मे खाली केल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्याने ही बाब ट्रान्सपोर्ट मालकाला कळवताच दादाभाऊ आनंदराव जंजाळ (33, रा.एच.बिल्डींग, 11 वा मजला, प्लॉट नं.1112 ता.हवेली, जि.पुणे) यांनी धाव घेत धुळे तालुका पोलिसात तक्रार नोंदवली.

प्रवासी बसवले, वाहनाद्वारे सुरू होता पाठलाग
इलेक्ट्रॉनिक्स वस्तू नेणार्‍या कंटेनरचा एक वाहन सातत्याने पाठलाग करीत असल्याचे उघड झाले असून कंटेनर चालकाने प्रवासादरत्यान दोन-तीन प्रवाशांना देखील बसवल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांनी चालकाला झोप आल्याची संधी साधत वस्तू लांबवल्या. ही बाब उघडकीस आल्यानंतर धुळे तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय शिंदे, पोलिस उपनिरीक्षक अनिल महाजन यांच्यासह पथकाने घटनास्थळी भेट देत पाहणी केली. चालकाच्या माहितीवरून त्याने बसविलेल्या प्रवाशांचा शोध सुरू केला. त्यातील अमोल रामराव सरदार (35 रा.हनुमानखेडे, ता.अचलपुर, जि.अमरावती) याला मंगळवार, 6 डिसेंबर रोजी रात्री पारोळ्याहून अटक करण्यात आली.


कॉपी करू नका.