भगदरीत आगील लाखो रुपयांचे धान्य खाक


Grain worth lakhs of rupees destroyed in Bhagdari fire नंदुरबार : अक्कलकुवा तालुक्यातील भगदरी येथील शेतकर्‍यांनी खरीप हंगामातील कापलेले पीक शेतातील खळयात रचून ठेवले होते. मात्र, दुपारच्या वेळी अचानक आग लागून हे सर्व धान्य जळून खाक झाले आहेत. त्यामुळे पाच ते सहा शेतकर्‍यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.

खळ्यात अचानक लागली आग
भगदरी गावांतील डोंगरफळी येथील प्रताप वसावे, गोवा वसावे, भरत वसावे, ओंमदया वसावे यांनी आपला खरीप हंगामातील पीक हे आपल्या गावातील शेतातच खळे करून रचून ठेवले होते. मात्र दुपारी तीन वाजेच्या सुमारास अचानक आपल्या खळ्यातील पिकाला आग लागल्याचे समजताच ते त्या ठिकाणी पोहचले. पण तोपर्यंत सर्व जळून खाक झाले होते. या खळ्यातील पीक हे सोयाबीन आणि भात होते. शेतकर्‍यांचे हंगामातील हाताशी आलेले उत्पन्न पूर्णपणे जळून खाक झाल्याने त्यांच्यावर संकट कोसळले आहे.

 


कॉपी करू नका.