Accused in Bhusawal with Gavathi Katta and live cartridge भुसावळात गावठी कट्टा व जिवंत काडतुसासह आरोपी जाळ्यात


Accused in Bhusawal with Gavathi Katta and live cartridge भुसावळ : पोलिसांच्या रेकॉर्डवरील कुविख्यात गुन्हेगाराला गावठी कट्टा व जिवंत काडतूसासह बाजारपेठ पोलिसांनी अटक केली. ही कारवाई शहरातील अमरनाथ नगर भागात गुरुवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास करण्यात आली. जितेंद्र उर्फ मोनू रामदास कोल्हे (33, अमरनाथ नगर, भुसावळ) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

गुन्हा करण्यापूर्वीच आवळल्या मुसक्या
संशयीत जितेंद्र गावठी कट्ट्याच्या धाकावर गुन्हा करण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती बाजारपेठ पोलिसांना मिळाल्यानंतर गुरुवारी संशयीताच्या अमरनाथ नगर भागातून मुसक्या आवळण्यात आल्या. आरोपीच्या ताब्यातून दहा हजार रुपये किंमतीचा गावठी कट्टा व दोनशे रुपये किंमतीचे जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. तपास पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनााली सहा.निरीक्षक हरीष भोये करीत आहेत.