Earthquake Bhusawal भुसावळसह परीसरात भूकंपाचे धक्के


Earthquake shocks in the area with Bhusaval भुसावळ : भुसावळ शहरासह सावदा परीसराला शुक्रवारी सकाळी 10.35 वाजेच्या सुमारास भूकंपाचे हादरे बसल्याने नागरीकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. भूकंपाची तीव्रता 3.3 रिश्टर स्केल इतकी असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

भुसावळसह सावदा परीसरात जाणवले धक्के
भुसावळ शहर व परिसरात शुक्रवारी सकाळी दहा वाजून 35 मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले. अनेक ठिकाणी इमारती हलल्या तर काही ठिकाणी घरातील भांडेदेखील पडल्याचे सांगण्यात आले तर काही वेळ या प्रकाराने गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. भुसावळसह लगतच्या कंडारी रायपुर भागातही दहा ते तीस सेकंद भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपात कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही. हतनूर येथे या संदर्भात संपर्क साधला असता यंत्रणा बंद असल्याने नेमकी माहिती कळू शकली नाही तर भुसावळ तहसीलदार दीपक धीवरे यांना विचारणा केली असता त्यांनी याबाबत आपणाला फोन आले असून आपण वरीष्ठ स्तरावर माहिती कळवली असून नाशिक येथील मेरी संस्थेकडून मिळालेल्या माहितीनंतर अधिक काही सांगता येईल, असे सांगितले.

नागरीक पटापट पडले इमारतीबाहेर
भुसावळ शहरातील काही नागरीकांना साडेदहाच्या सुमारास घरांना हादरे बसल्याची, तसेच काहीतरी मोठ्याने पडल्यावर जसा आवाज येतो, तसा आवाज आल्याचे सांगितले. काही इमारतींमधून नागरीक त्वरेने बाहेर पडले. नागरीकांनी घाबरू नये तसेच अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

 


कॉपी करू नका.