भुसावळात 12 मार्च रोजी ‘लेडीज रन’ ; नावनोंदणीस सुरुवात


भुसावळ : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून भुसावळ स्पोर्ट्स अ‍ॅण्ड रनर्स असोसिएशनतर्फे 12 मार्च रोजी लेडीज इक्वॅलिटी रन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. 3, 5 व 10किमी या तीन गटात महिला व मुलींसाठी स्पर्धा होईल. त्यासाठी नावनोंदणी आवश्यक असून प्रत्येक सहभागी महिला स्पर्धकास आयोजकांतर्फे टी-शर्ट, पदक, इ प्रमाणपत्र दिले जाईल. शिवाय रनिंग दरम्यान रूट सपोर्ट, पेयजलांची व्यवस्था व रनिंग नंतर पौष्टिक नात्याची व्यवस्था करणयात आली असून रन आधी वार्म अप व रनिंग नंतर स्ट्रेचिंग एक्सरसाइज झुंबाद्वारे घेण्यात येईल. त्याशिवाय विविध आकर्षक बक्षिसे देखील स्पर्धकांसाठी आहेत.

नाव नोंदणीसाठी आवाहन
नावनोंदणी ऑनलाइन व प्रत्यक्ष फॉर्म भरून ऑफलाइन पद्धतीने करता येईल. त्यासाठी इच्छुक महिलांनी भुसावळ स्पोर्ट्स अ‍ॅण्ड रनर्स असोसिएशनच्या महिला धावपटूंशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. दर मंगळवारी, गुरुवारी व रविवारी भुसावळ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्रीडांगण अर्थात डी.एस.ग्राउंड येथे रनिंगच्या सरावानंतर सकाळी 7.00 ते 7.30 या वेळेत देखील नाव नोंदणी करता येईल. याशिवाय नावनोंदणीचे फॉर्म डॉ.चारुलता पाटील (9823799758) यांचे सुप्रभा हॉस्पिटल ,जळगाव – यावल रोड, पंचमुखी हनुमान मंदिराजवळ, भुसावळ व डॉ. नीलिमा नेहेते (9325638717) यांचे नेहेते हॉस्पिटल, जामनेर रोड, भुसावळ येथे देखील उपलब्ध आहेत. शिवाय ऑनर्लाइन नोंदणीसाठी गुगल फॉर्म उपलब्ध असून त्यासाठी प्रवीण पाटील (9422772178) यांना संपर्क करता येईल, अशी माहिती भुसावळ स्पोर्ट्स अ‍ॅण्ड रनर्स असोसिएशनचे प्रमुख प्रा.प्रवीण फालक यांनी कळविले आहे.


कॉपी करू नका.