उधारी मागण्यासाठी आलेल्या डॉक्टरांवर विळ्याने हल्ला : सुकळीतील घटना


Sickle attack on doctor who came to ask for loan : incident in Sukli मुक्ताईनगर : उधारीचे पैसे मागण्यासाठी घरी आलेल्या डॉक्टरांशी हुज्जत घालून त्यांच्यावर विळ्याने हल्ला करण्यात आल्याची घटना तालुक्यातील सुकळी येथे गुरुवारी सकाळी 10 वाजता घडली. या प्रकरणी डॉ.विजय भास्कर जाधव (पाटील, 57, उचंदा) यांच्या तक्रारीवरून संशयीत ब्रिजलाल सूर्यभान पाटील (सुकळी) याच्याविरोधात मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

पैसे मागितल्याने विळ्याने हल्ला
उचंदे येथील डॉ.विजय भास्कर जाधव (पाटील) यांनी सुकळी येथील ब्रिजलाल पाटील यांना मागील उधारीचे पैसे मागितले असता संशयीताने गच्ची पकडून शिविगाळ केली तसेच कशाचे पैसे म्हणत विळ्याने हल्ला केल जर परत पैसे मागण्यासाठी आला तर तुला जिवंत सोडणार नाही म्हणत धमकीही देण्यात आली. डॉ.विजय पाटील यांनी मुक्ताईनगर पोलिसात फिर्याद दिल्यावरून आरोपी ब्रिजलाल पाटील विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास नाईक विकास नायसे करीत आहेत.


error: Content is protected !!