दौंडमधील पोलीस उपनिरीक्षकांचा कर्तव्यावर मृत्यू : यावलला शासकीय इतमामात यावलला अंत्यसंस्कार


Police sub-inspector in Daund dies in line of duty: Yavala cremated in official ceremony यावल : शहरातील बोरावल गेट भागातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगरातील रहिवाशी तथा दौंडला कार्यरत पोलीस उपनिरीक्षक किरण पंढरीनाथ अडकमोल (55) यांचा कर्तव्यावर असताना ह्रदयविकाराने मृत्यू झाल्यानंतर त्यांच्यावर मंगळवारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

36 वर्षांपासून पोलीस दलात कार्यरत
अडकमोल हे गेल्या 36 वर्षापासून पोलीस दलात सेवेत होते.
यावल शहरातील बोरावल गेट भागातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगरातील रहिवास असलेले किरण पंढरीनाथ अडकमोल (55) हे गेल्या 36 वर्षांपासून पोलीस दलात होते. सध्या ते पुणे जिल्ह्यातील दौंड येथे पोलीस उपनिरीक्षक या पदावर कार्यरत होते. कर्तव्यावर असताना सोमवारी त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला.

यावल शहरात अंत्यसंस्कार
मंगळवारी त्यांचा मृतदेह यावल येथे आणण्यात आला व शहरातील श्री महर्षी व्यास मंदिराजवळी लस्मशानभुमीत शासकीय इतमात त्यांच्यावर अंतसंस्कार करण्यात आले. या प्रसंगी दौंड पोलीस दल, जळगाव पोलीस दल आणि यावल पोलिस दलातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. मयत अडकमोल यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलं, मुलगी असा परीवार आहे.


कॉपी करू नका.