भुसावळ शहरातील मोक्का लागलेल्या संशयिताचा अपघाती मृत्यू

दुचाकी घसरून झाला अपघात : नशिराबाद पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद


Accidental death of the suspect in the attack in Bhusawal city भुसावळ : पोलिस दप्तरी कुविख्यात म्हणून ख्याती असलेल्या कै.निखील राजपूतचा साथीदार व मोक्काच्या गुन्ह्यातील संशयिताचा अपघात घडल्यानंतर उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना बुधवार, 27 रोजी दुपारी घडली. याप्रकरणी नशिराबाद पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. अभिषेक राजेश शर्मा (24, चमेली नगर, भुसावळ) असे मयताचे नाव आहे.

दुचाकी घसरली अन गाठले मृत्यूने
समजलेल्या माहितीनुसार, भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाणे हद्दीत अभिषेक शर्मा याची दुचाकी 21 डिसेंबर रोजी घसरली व त्यात तो गंभीर जखमी झाल्याने त्यास जळगावातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने मंगळवार, 26 रोजी रात्री त्यास गोदावरी रुग्णालयात दाखल करण्यात आले व बुधवारी सकाळी 9 वाजून मिनिटांनी त्याचा मृत्यू ओढवला. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांचा ताब्यात देण्यात आला.

फौजदारावर हल्ला प्रकरणी दाखल होता गुन्हा
शनिवार, 27 नोव्हेंबर 2021 रोजी बाजारपेठ पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक महेश भास्कर घायतड यांना श्रीराम नगरातील हनुमान मंदिराजवळ करणी सेनेचा खान्देश अध्यक्ष व कुविख्यात निखील राजपूत याने मारहाण केली होती तसेच पिस्टलने उडवून टाकण्याची धमकीही दिली होती. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक महेश भास्कर घायतड यांच्या फिर्यादीनुसार पोलिसांच्या रेकॉर्डवरील अट्टल आरोपी निखील राजपूतसह अक्षय न्हावकर उर्फ थापा, गोलू कोल्हे, नकुल राजपूत, आकाश पाटील, अभिषेक शर्मा, निलेश ठाकूर व अन्य एका अनोळखीविरोधात भाग पाच, गुरनं.307, 353, 332, 143, 147, 149, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. काही संशयितांना या गुन्ह्यात अटकही करण्यात आली व नंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली.

सात संशयितांवर लागला होता मोक्का
खाकीच्या अधिकार्‍याला धमकी व मारहाणीच्या प्रकरणात पोलिसांनी भादंवि 307 या गुन्ह्यातील सात संशयितावर मोक्कान्वये कारवाईचा प्रस्ताव डॉ.बी.जी.शेखर यांच्याकडे पाठवल्यानंतर त्यास मंजुरी मिळाली. त्यावेळी निखील सुरेश राजपूत, अक्षय प्रकाश थापा, नकुल थानसिंग राजपूत, आकाश गणेश पाटील, निलेश चंद्रकांत ठाकूर, चेतन संतोष पाटील उर्फ काल्या यांना मार्च 2022 मध्ये मोक्का लावण्यात आला. दरम्यान, भादंवि 307 मध्ये संशयितांना अटक केल्यानंतर पोलिसांनी न्यायालयात बेल रीजेक्टसाठी अर्ज दाखल केल्यानंतर तो मंजूर झाला मात्र संशयित खंडपीठात त्याविरोधात अपिलात गेल्याने 2 मे 2022 रोजी खंडपीठाने संशयिताचे म्हणणे ऐकून घ्यावे, असे आदेश पोलिसांना दिले त्यामुळे नंतर संशयितांवर कारवाई प्रस्तावीत राहिली असून अद्याप या प्रकरणी न्यायालयात सुनावणी सुरूच आहे तर मोक्काच्या गुन्ह्यात संशयित निखील राजपूतसह अभिषेक शर्मा यांचा मृत्यू ओढवला आहे.


कॉपी करू नका.